फैजपुर प्रतिनिधी। फैजपुर शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी शेख रियाज शेख साबीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या नियुक्तीचेपत्र जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्याहस्ते देण्यात आले. नवनिर्वाचित शहर अध्यक्ष शेख रियाज यांच्या नियुक्ती झाल्याने माजी आमदार शिरीष चौधरी, म.सा.का चेअरमन शरद महाजन, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, म.सा.का संचालक नरेंद्र नारखेडे, पं.स.माजी सभापती लीलाधर चौधरी, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे, काँग्रेस गटनेता कलिम खॉ मण्यार, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, माजी नगरसेवक शेख जफर, चंद्रशेखर चौधरी, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील यांच्यासह शहर काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी त्यांच्या निवड बद्दल अभिनंदन होत आहे.