फैजपूर, ता. यावल-निलेश पाटील | खान्देशवासीयांचे आराध्यदैवत जागृत देवस्थान म्हणूनखंडोबारायचे (मल्हारी मार्तंड) Faizpur Khandoba Yatra फैजपूर शहरातील राज्यभर प्रसिद्ध असलेल्या देवस्थानाच्या यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून यात लक्षावधी आबालवृध्द सहभागी होणार आहेत.
असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान तसेच अतिशय जागृत देवस्थान म्हणून फैजपूर येथील खंडोबाराय देवस्थानाची ख्याती आहे. येथीलखंडोबारायच्या मंदिराची स्थापना सुमारे १५० वर्षांपूर्वी झाली. या देवस्थांनात असलेलीखंडोबाची मूर्ती अतिशय पुरातन असून श्रीमंत महाराज होळकर सरकार इंदूर राजाची देणगी आहे. आख्यायिकेनुसार सदर मूर्ती फैजपुरहून तीन कि.मी. येथील असलेल्या न्हावी या गावी भाविक नेत असतांना मूर्ती वाहून नेणारी बैलगाडी अचानक थांबली ती पुढे सरकलीच नाही. दरम्यान फैजपूर वासीयांच्या स्वप्नात खंडोबानी येऊन माझी याच जागेवर प्राणप्रतिष्ठा करावी असा दृष्टांत दिला. यामुळे येथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
गावकर्यांच्या मदतीने खंडोबा देवस्थानाची उभारणी
खंडोबा देवांची फाल्गुन शुध्द पौर्णिमेस मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याने दरवर्षी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेपासून यात्राभरण्याची प्रथा पडली. मध्यंतरी कोरोनाची दोन वर्षे वगळता हा यात्रोत्सव अव्याहतपणे सुरू आहे.
दरम्यान, परंपरेनुसार यंदाचा यात्रोत्सव दिनांक ६मार्च ते १४ मार्चपर्यंत असा ९ दिवस सुरू राहणार आहे .खंडोबा देवस्थानत दिनांक ७ मार्च रोजी भाविक भक्तांकडून भंडारा उधळण्यात येणार आहे.
यात्रोत्सवानिमित्त अध्यात्मिक नकाश्यावर फैजपुरचे स्थान भारतवर्षात अढळ झाले आहे.यात्रासुरळीत पार पाडण्यासाठीखंडोबादेवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज , उत्तराधिकारी पवनजी महाराज ,पुजारी राम मनोहरदाजी महाराज या महाराजांनी .यात्रेचे काटेकोर नियोजनासाठी सर्वधर्म व संप्रदयाच्या संतमहंत, लोकप्रतिनिधी व नगरवासीयांपर्यंत पोचवण्याचे सूतोवाच केले आहे.
महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराजांनीखंडोबादेवस्थान परिसरात एक नवचैतन्य निर्माण केले आहे. रोज सकाळ – संध्याकाळ अध्यात्माच्या रंगात महाराजांसंमवेत शेकडो भाविक भक्त रंगून जातात दररोज शिवस्तुती , रामरक्षा, रामस्तुती, जानकीस्तुती ,खंडोबास्तुती नित्यनायमाणे देवस्थानात होत असते. सर्व हिन्दू धर्मातील विविध पंथ संप्रदाय यांना एकत्र आणण्याचे महाराजांचे कार्यकौतुकास्पद आहे.
महंत नृत्य गोपालदाजी महाराज यांचा आशीर्वाद
देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज यांचे गुरु राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अध्यक्ष महंत श्री नृत्य गोपालदासजी महाराज श्रीधाम अयोध्या यांनी खंडोबा देवस्थान यात्रेस आशीर्वाद दिले आहेत.
संपूर्णयात्रानगरपालिका फैजपूर, पोलीस प्रशासन, शासकीय-अधिकारी , समस्त फैजपूरवासीय यांच्या सहकार्याने यशस्वी करण्याचे तसेच सर्वांना यात्रेस समाविष्ट होण्याचे आव्हानखंडोबादेवस्थान गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजींनी केले आहे.
लाखो भाविक येणार
या यात्रेत महाराष्ट्र, गुजरात , मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश सह विविध राज्यातून व्यापारी येतात. तर राज्याच्या कानाकोपरयातून दर्शनासाठी यात्रेच्यावेळी लाखो भाविक येतात. खंडोबाची मूर्ती अतिशय देखणी व अश्वारूढ आहे. हे देवस्थान समस्त खान्देशवासीयांचे आराध्य दैवत असल्याने येथे कर्णछेदनाचे कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर होतात.
भरगच्च भरणार्या यात्रेत विविध दुकाने मनोरंजनपर कार्यक्रम, लोकनाट्य मंडळ ,३० ते ३५ कलावंतांची कमांडो सर्कस ही दाखल झाली आहे. या यात्रोत्सवात प्रसिद्ध महाकाली रेवडी, भांडारचे सुकलाल भोई सावदा यांची प्रसिद्ध रेवडी आकर्षण असते. यात्रेत विशेष म्हणजे दिव्यांग सेनातील कार्यकर्ते नानाभाई मोची ढोल ताशेवाला हे देखील लक्ष वेधून घेतात. तसेच भांड्यांचे दुकाने विविध खाद्यपदार्थांचे दुकाने , लहान मोठे पाळणे , मौतक ाकुवा यासह अनेक प्रकारची दुकाने ठाम मारून दाखल झाली आहे.
फैजपूर शहराच्या ठराविक वाड्यात तमासगीर (तकदजी) तिन दिवस ठाम माडुंण बसतात हे कलावंत रसिकांची करमणूक करतात. अशा या एक भव्य नयनमनोहर ॥ भावभक्तिपूर्व , सामाजिक, आर्थिक, धार्मिक महोत्सवासाठी ऐतिहासिक फैजपूरनगरी सज्ज झाली आहे.
दरम्यान, यात्रेतील भाविकांना मोफत औषधोपचार करण्यासाठी फैजपूर येथील डॉक्टरांचे एक पथक अहोरात्र सज्ज झाले आहे. यात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून डी. वाय.एस.पी कुणाल सोनवणे, प्रांताधिकारी कैलास कडलक, तहसीलदार महेश पवार, ए. पी.आय. सिद्धेश्वर आखेगावकर, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पी.एस.आय. मोहन लोखंडे, कमउद्दिन शेख, गोपनीय विभागाचे हेमंत सांगळे, योगेश दुसाने, राजेश बर्हाटे,उमेश चौधरी, अमजद पठाण व पोलीस स्टाफ, होमगार्ड स्टाफ , वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता विवेक सरोदे, व त्यांचा कर्मचारी स्टाफ, फैजपूर भाग सर्कल हनीफ तडवी, बी .एल तायडे, तलाठी तेजस पाटील, तुषार जाधव ,संजू राजपूत ,या प्रशासन अधिकारी बरोबर त्याचे सर्व कर्मचारी तसेच दक्षता समिती कार्यकर्ते यांनी अचूक नियोजन केले आहे.