Home Cities यावल स्व. जे. टी. महाजन यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

स्व. जे. टी. महाजन यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

0
43

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | माजी मंत्री तथा सहकार व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर म्हणून ख्यात असणारे दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या सोळाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली अर्पण करण्यात आली.

स्व दादासाहेब जे टी महाजन यांना आज १६ व्या पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेज,फैजपूर च्या आवारातील दादासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी दादासाहेबांच्या जीवनकार्याला उजाळा देऊन त्यांनी दिलेल्या विचारांवरून वाटचाल सुरू ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.

या प्रसंगी संस्थाध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, विजय झोपे, मार्तंड भिरुड, प्रभाकर सरोदे, भागवत पाटील, लीलाधरशेट चौधरी, नरेंद्र नारखेडे, सुभाष भंगाळे, रामा पाचपांडे, शशिकांत चौधरी, नितीन सर, धनु सर, उमेश बेंडाळे यांच्यासह सर्व संस्थांचे प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व दादासाहेबांवर प्रेम करणारे स्नेहीजन हजर होते.


Protected Content

Play sound