Home राजकीय हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त फैजपूर काँग्रेसतर्फे वृक्षारोपण 

हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त फैजपूर काँग्रेसतर्फे वृक्षारोपण 


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर-यावल विधानसभा क्षेत्रात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत फैजपूर शहर काँग्रेस कमिटीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. जनतेशी सामाजिक नाळ मजबूत ठेवण्याच्या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमाला स्थानिक पातळीवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या वृक्षारोपण कार्यक्रमाचे नेतृत्व आमदार शिरीषदादा चौधरी आणि युवानेते धनंजयभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमात शहर काँग्रेस अध्यक्ष रियाज शेख, फैजपूरचे माजी उपनगराध्यक्ष कलीम मेंबर, ज्येष्ठ नेते जी.पी. पाटील सर, डॉ. दानिश शेख, एजाज सर, निलेश मंडवाले, ईश्वर इंगळे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

फैजपूर शहरात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या वृक्षारोपणामुळे पर्यावरण जागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला. काँग्रेस पक्षाने वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधत लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. केवळ राजकारणापुरता मर्यादित न राहता, समाजाच्या सर्वांगीण हितासाठी काम करणारा पक्ष म्हणून काँग्रेसने जनतेच्या मनात आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सामाजिक, पर्यावरणीय व लोककल्याणाच्या उपक्रमांमधून जनतेशी थेट संपर्क साधत असल्याने कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य आणि प्रेरणा निर्माण होत आहे.


Protected Content

Play sound