शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्काळ द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन ; संभाजी ब्रिगेडचा इशारा

WhatsApp Image 2019 07 01 at 6.46.36 PM

धरणगाव (प्रतिनिधी) :   तालुक्यात १५ ते २० दिवसांपासून पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले असून प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेड धरणगाव तालुकातर्फे करण्यात आली आहे.

शासकीय यंत्रणेने व जळगाव ग्रामीण आमदार तथा सहाकार राज्य मंत्री ना.गुलाबराव पाटील हे दुर्लक्ष करीत असुन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना सोसायटी वेळेवर मिळत नसुन तसेच बोंडअळीचे अनुदान देखील अनेक शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचे संभाजी ब्रिगेडतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. शासन हे फक्त निवडणुकांच्या तयारीत व्यस्त असून केवळ निवडणूक कशी जिंकायची याकडे त्यांचे लक्ष आहे. शासनास शेतकऱ्यांच्या येणाऱ्या समस्या सोडविण्यास वेळ नसुन शासकीय यंत्रणेने शेतीचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी व तस न केल्यास संभाजी ब्रिगेडतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष गोपाल पाटील व सर्व पदाधिकाऱ्यांनी व सर्व कार्यकर्त्यांनी दिलेला आहे.

Protected Content