मुंबई प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानेच राज्य सरकारने तातडीने वीज बील वसुली सुरू केल्याचा दावा करत देवेंद्र फडणवीस यांनी यावर टीकास्त्र सोडले आहे.
वीज वितरण कंपनीने राज्यात आता धडक वसुली मोहिम सुरू केली असून यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की,
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ठाकरे सरकारने वीजबिल वसुली सुरु केली आहे. राज्य सरकारने हजारो कोटींची सुट बिल्डर्संना दिलेली आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात सामान्य लोकांकडे रोजगार नव्हता. अशाववेळी सामान्य लोकांचे ४ पट जास्त अलेले बिलं हे सुधरवण्याची गरज होती. मात्र असं न करता थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचं काम सरकारकडून करण्यात येत आहे