जळगाव प्रतिनिधी । नारी शक्ती ग्रुप जळगावतर्फे बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबांसाठी मांगीलालजी बाफना नेत्रपेढी यांच्या वतीने नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. तसेच यावेळी चष्मे देखील वाटप करण्यात आले.
यात आदित्य ढवळे पाटील बहुद्देशीय सेवाभावी संस्था बेघर निवारा केंद्र येथील एकूण 32 जणांची नेत्रतपासणी केशव स्मृती प्रतिष्ठान व आरसी बाफना फाऊंडेशन संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढी व चिकित्सालय या ठिकाणी डॉ.नयना पाटील, एम. एस.ऑप्थो. यांनी केली व नेत्र तपासणीतून चष्मे महापौर जयश्री महाजन, उपायुक्त शाम गोसावी व इतर मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. बऱ्याचदा आपण बघतो की वाढदिवस हे पुष्पगुच्छ देऊन केक कापून अथवा अन्नदान करून साजरे केले जातात. पण नारीशक्ती ग्रुपच्या अध्यक्ष मनिषा पाटील व सुमित्रा पाटील यांचा वाढदिवस याला अपवाद असुन बेघर निवारा केंद्र येथील आजी आजोबांसोबत येत्या हिवाळ्याची चाहूल पाहता गरजूंना स्वेटर वाटप करून साजरा करण्यात आला. समाजापुढे एक आदर्श निर्माण करीत आहे. यात नारीशक्ती पदाधिकारी अध्यक्ष मनीषा पाटील, सुमित्रा पाटील, ॲड.सीमा जाधव ज्योती राणे भावना चौहान, ॲड वैशाली बोरसे, नूतन तासखेडकर, माधुरी शिंपी यांची उपस्थितीत आदित्य ढवळे बहुद्देशीय बेघर निवारा केंद्र जळगाव येथे संपन्न झाला.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1980266665465682