कामांच्या मंजुरीवरून मुक्ताईनगरात सत्ताधाऱ्यांमध्येच टोकाचे मतभेद ! (व्हिडीओ)

मुक्ताईनगर : प्रतिनिधी । शहरातील कामांच्या मंजुरीवरून सत्ताधाऱ्यांमध्येच टोकाचे मतभेद होऊन दुफळी मजल्याचे चित्र आज नगरपंचायतीच्या विशेष सभेत स्पष्ट झाले

काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर शहरातील असंख्य नागरिकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्या त्या प्रभागातील समस्या मांडल्या होत्या त्या सोडवण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे कामे करण्यासंदर्भात मागणी केली होती त्या मागणीनुसार मंत्रीमहोदयांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान या योजनेतून कामांना मंजुरी देऊन कामे करण्यासाठी निधी मुक्ताईनगर नगरपंचायतकडे वर्ग केले. परंतु कामे मुक्ताईनगर शहरामध्ये नगरपंचायत हद्दीत करायचे असल्यास कामांना नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी व नाहरकत लागत असते त्या अनुषंगाने आज मुक्ताईनगरच्या नगराध्यक्ष नजमा तडवी यांनी कामांना नाहरकत व मंजुरी देण्यासाठी आज विशेष सभा बोलवली होती परंतु सभेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी कामांना मंजुरी व ना हरकत देण्यात येऊ नये अशी भूमिका घेतली यासाठी मतदारसंघाचा तत्कालीन विकास पुरुष म्हणवून घेणारे नेत्याने या नगरसेवकांवर दबाव आणून त्यांना या कामांना मंजुरी अथवा नाहरकत देऊ नका असे खडसावले होते व प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता अशी चर्चा आहे.

सत्ताधारी पक्षातील सहा व शिवसेनेच्या तीन अशा 9 नगरसेवकांनी कामांना मंजुरी व नाहरकत देण्यासाठी बहुमत दिले परंतु सत्ताधारी पक्षातील सहा नगरसेवकांनी कामांना विरोध करून मुक्ताईनगर शहराच्या विकासाला खोडा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे मतदारसंघाचे विकासाचे महापुरुष म्हणणाऱ्या त्या व्यक्तीला आमदार चंद्रकांत पाटील यांनी आणलेली व पालकमंत्र्यांनी दिलेली कामे शहरात होऊ द्यायची नाही हा उद्देश त्यांचा असून त्यांचा करेक्ट कार्यक्रम यावेळेस सपशेल फोल ठरला आहे यावरून असे सिद्ध होते की मुक्ताईनगर शहरवासीयांना विकासापासून वंचित ठेवणे हेच त्यांचे विकासाबद्दल राजकारण आहे काय? असा सवाल शिवसेना गटनेते राजेंद्र हिवराळे यांनी केला माजी आमदार व त्यांचे समर्थक नगरसेवक विकासकामांना विरोध करून नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचे पाप करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आम्ही आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने शहरात विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध आहोत असेही हिवराळे यांनी स्पष्ट केले.

 

 

Protected Content