भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ बसस्थानक परिसरात एका वृध्दाच्या खिशातून सहा हजारांची रोकड अज्ञात व्यक्तीने हाताला धक्का मारून जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना सोमवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामू निंबा सुरवाडे वय-७६, रा. खंडाळा ता. भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. सोमवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता रामू सुरवाडे हे त्यांचे नातू चंद्रकिरण सुरवाडे यांच्यासोबत डिप्लोमा इंजीनियरिंगची फी भरण्यासाठी सोबत पैसे घेऊन भुसावळ शहरातील बसस्थानकात आले होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांना धक्का मारून त्यांच्या खिशातील ६ हजार रुपयांची रोकड जबरी हिसकावून चोरून नेली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर रामू सुरवाडे यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार दुपारी २ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे.