बळीराम पेठेतील व्यापाऱ्याचा महागडा मोबाईल खिश्यातून लांबविला

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स जवळून व्यापाऱ्याचा २० हजाराचा मोबाईल चोरट्याने चोरून नेल्याचे  लंपास केल्याची घटना घडली. जिल्‍हापेठ पोलिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, बळीराम पेठेतील व्यापारी गुरफान उस्मान शेख (वय-३३) हे सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कामानिमीत्त छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समध्ये आले. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कॉम्प्लेक्स मधील जम्बो झेरॉक्स दुकाना समोरुन अज्ञात चेारट्याने त्याच्या खिश्यातून २० हजारांचा मोबाईल अलगद चोरुन पोबारा केला. थोड्याचा वेळात त्यांना मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शोधाशोध केली परंतू मोबाईल आढळून आला नाही. गुरफान शेख यांच्या तक्रारीवरुन जिल्‍हापेठ पेालिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पेालिस नाईक सुभान तडवी करत आहेत.

 

 

Protected Content