जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३० व्या दीक्षांत समारंभात ज्या विद्यार्थ्यांना पदवी/पदवीका प्रमाणपत्र घ्यावयाचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढविण्यात आली आहे.
विद्यापीठातर्फे ऑक्टोंबर,२०२० व एप्रिल/मे-२०२१ मध्ये आणि त्यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि पी.एचडी. धारक अशा सर्व विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर quick links मध्ये online application for degree certificate या link वर उपलब्ध आहे.
त्यानुसार विनाविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. १५ डिसेंबर,२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ३१ डिसेंबर, २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
उत्तीर्ण वर्षापासून पाच वर्षाच्या आत पदवीप्रमाणपत्र शुल्क रूपये ३५०/- असून उत्तीर्ण वर्षापासून पाच वर्षा पेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास रूपये १०००/- भरावे लागतील. पदवीप्रमाणपत्राचे शुल्क क्रेडिट कार्ड/डेबीट कार्ड/ नेट बँकिग द्वारे ऑनलाईन भरावे असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक प्रा.किशोर पवार यांनी केले आहे.