शिंदाड येथील शालेय शिक्षण समिती अध्यक्षपदी संदीप बोरसे

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील शिंदाड येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी संदिप बोरसे तर उपाध्यक्ष पदी विनोद तडवी यांची निवड करण्यात आली आहे.

आज दि. १४ रोजी ११ .३० वाजता शाळेत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडला ह्या वेळी बोट वरती करून उपस्तीत १० पैकी ८ सदस्यांनी संदीप शांताराम बोरसे यांचे नावाला पसंती दिली तर उपाध्यक्ष पदासाठी विनोद कचरू तडवी यांचे नावाला पसंती दिली ११ पैकी १० सदस्य निवडीला उपस्तीत होते यावेळी नवनिर्वाचित सदस्य पूनम प्रदीप श्रावणे, कोकिळा धनंजय पाटील, कविता तांबे, सोनल श्रीकांत पाटील, रहेमान मशीद तडवी, सुलताना तडवी, तुषार भगवान सांबरे, दिलशान तडवी उपस्तीत होते. मुख्याध्यापक प्रशांत पाटील यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.

नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र पाटील यांनी केला. ग्राम पंचायत सदस्य संदीप सराफ, स्वप्नील पाटील, विलास पाटील, धनराज पाटील, प्रदीप श्रावणे, दशरथ पाटील, राजू तडवी, धनंजय व्यवहारे, दिपक परदेशी शशिकांत निकम, श्रीकांत पाटील, पिंटू सुतार उपस्तीत होते. नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप बोरसे, उपाध्यक्ष विनोद तडवी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

Protected Content