पीएच.डी.साठी मार्गदर्शकाच्या संमतीपत्रासाठी मुदतवाढ !

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी.साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शकाचे (गाईड) संमतीपत्र ऑनलाईन सादर करण्याची अंतीम तारीख ७ सप्टेंबर ऐवजी १५ सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.

विद्यापीठाने यापूर्वीच मार्गदर्शकांची यादी जाहीर केलेली असून त्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रकानुसार पीएच.डी.साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शकाचे संमतीपत्र ७ सपटेंबरपर्यंत ऑनलाईन सादर करण्याची मुदत दिली होती. या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली असून २९ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक तज्ज्ञांशी संपर्क करून १५ सप्टेंबर पर्यंत मार्गदर्शकाचे संमतीपत्र ऑनलाईन सादर करण्याची मुदत देण्यात आली असल्याची माहिती संशोधन विभागाचे सहा. कुलसचिव व्ही.व्ही.तळेले यांनी
दिली.

Protected Content