रिक्षा प्रवशांना लुटणारी टोळीचा पर्दाफाश; चौघे गजाआड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रिक्षातील प्रवाशांना लुटणारी टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून या गुन्ह्यातील चार गुन्हेगारांना डि-मार्ट परिसरातून रिक्षासह गजाआड केले आहे. चौघांकडून १ लाख ९ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

गेल्या महिन्याभरापासून जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी रिक्षात प्रवाशांना बसवून हातचालाखीने त्यांचे पैसे चोरून त्यांना रस्त्यावर उतरवून पसार होण्याच्या घटना घडल्या आहे. या गुन्ह्यातील आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार मासीन उर्फ शेमड्या पठाण व इतर साथीदार यांनी चोरी केल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ जितेंद्र पाटील, सुनिल दामोदरे, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, किरण धनगर,  प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, नंदलाल पाटील, ईश्वर पाटील, राजेंद्र पवार यांचे पथक तयार करून सापळा रचला. गोपनिय माहितीद्वारे डी-मार्ट परिसरातून संशयित आरोपी मोसीन खान उर्फ शेमड्या नुरखान पठाण (वय-२८) रा. पिंप्राळा हुडको, अरशद शेख हमीद शेख (वय-२३), शेख फिरोज शेख करीम (वय-३०) आणि मनोज विजय अहिरे (वय-३१) तिघे रा.  गेंदालाल मिल, जळगाव यांना रिक्षासह ताब्यात घेतले. चौघांनी यावल आणि पारोळा येथील गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीतील १ लाख ९ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Protected Content