नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्र सरकारने गहू निर्यातीवर बंदी घातली असून यामुळे वाढलेल्या गव्हाच्या किमती आटोक्यात येणार आहे. तथापि, यामुळे चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेत असलेल्या शेतकर्यांना फटका बसणार आहे.
केंद्र सरकारने गव्हाची निर्यात बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यंदा विक्रमी निर्यातीमधून अधिकचे उत्पन्न मिळेल असा अंदाजही व्यक्त करण्यात आला होता. पण गव्हाचे दर वाढले असून आगोदर देशातील दर नियंत्रित ठेवणे महत्वाचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गहू निर्यातीला ब्रेक लागणार आहे. अर्थात, यामुळे देशातील गव्हाचे वाढलेले भाव आटोक्यात येणार आहेत.
रशिया आणि युक्रेनमधील युध्दामुळे जागतिक बाजारपेठेत गव्हाची मागणी मागणी वाढली होती. परिणामी भारतातून निर्यातही वाढली. मात्र यामुळे देशातील गव्हाचे भाव वाढल्याने आज निर्यात बंदी जाहीर करण्यात आली असून याबाबत केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये घोषणेच्या आधी किंवा त्या दिवसापर्यंत ज्या गव्हासाठी लेटर ऑफ क्रेडिट देण्यात आले आहे, त्याच प्रमाणात गव्हाची निर्यात केली जाणार आहे. यामुळे भाव आटोक्यात येणार असले तरी शेतकर्यांचे नुकसान होणार आहे.