नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी गहू आणि साखरवर निर्यातबंदी घातली असून यात आता अजून तांदळासह अन्य बाबींचाही समावेश होण्याचे संकेत मिळाले आहेत.
वाढत्या महागाईने हैराण झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार एकीकडे आयातीवरील शुल्क कमी करत असताना दुसरीकडे निर्यात होणाऱ्या वस्तूंवर निर्यात शुल्क वाढवत आहे. तसेच निर्यात कमी करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. गहू निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आता केंद्र सरकार तांदूळ निर्यातीवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा सल्ला पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) तयार करण्यात आलेल्या समितीने दिला आहे. पीएमओची ही समिती प्रत्येक वस्तूची किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी अभ्यास करत आहे. दरम्यान, तांदळासोबत अजून पाच महत्वाच्या बाबींवर निर्यातबंदी येण्याची शक्यता आहे. यात कापसाच्या निर्यात बंदीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.