चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील सांगवी येथे एका ऊसतोड मजुराच्या घरात अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या आगीत रोकडसह तीन लाखाचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील सांगवी येथील दामु फंदु राठोड हा ऊसतोड मजूर असून त्यावरच आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित असतात. दरम्यान राठोड हा नुकतीच ऊसतोडणी वरून घरी परतला आहे. मात्र त्यांच्या पत्नी सकाळी ९ वाजताच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना अचानक गॅसचा स्फोट झाला. यावेळी घरातील संसार उपयोगी वस्तूंसह ५ ग्रॅम सोने, बाजरीचे धान्य, बैलांची विक्री करून कपाटात ठेवलेले १ लाख रुपये असे एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटना बुधवार, ११ रोजी घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शेजारील धनंजय ठाकरे यांच्याही घराचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सदर घटनेचा पंचनामा करण्यात आले आहे. तत्पूर्वी राठोड कुटुंबाचे संसार पूर्णतः उद्धवस्त झाला आहे. यामुळे पिडीतांचे जगणे असाह्य झाले आहे. मदतीची आस धरून बसलेल्या या कुटुंबाला आर्थिक मदत तातडीने मिळेल का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र सदर स्फोट हा कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे.