वधू-वर मेळाव्यातून समाजातील चांगल्या कामांचा विचार करणे अपेक्षित – खा. रक्षा खडसे (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 11 10 at 2.48.51 PM 1

जळगाव, प्रतिनिधी | युवक-युवती परिचय मेळाव्याचा उद्देश केवळ वधू-वर मेळावा घेणे एवढा नसून तर यामाध्यमातून समाजाने एकत्र येऊन समाजात घडलेल्या चांगल्या कामांचा विचार केला जातो असे प्रतिपादन खासदार रक्षाताई खडसे यांनी केली. त्या श्री लेवा गुर्जर सेवा प्रतिष्ठान, जळगावतर्फे आयोजित लेवा गुर्जर समाजाच्या विवाहेच्छुक युवक-युवतींचा राज्यस्तरीय परिचय मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. हा कार्यक्रम सरदार वल्लभाई सरदार पटेल भवनात संपन्न झाला.

लेवा गुर्जर समाजासाठी आगामी वर्षभरात हॉल बांधण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल असे आश्वासन आ. राजूमामा भोळे यांनी दिले. समाजाचा  हक्काचा हॉल असल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो असे आ. भोळे यांनी स्पष्ट केले. तसेच लेवा पाटील व लेवा गुर्जर समाजात रोटी बेटी व्यवहार सुरु कण्यात यावा अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. शांताराम महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजूमामा भोळे हे उपस्थित होते. यावेळी विवाहेच्छुक युवक-युवती परिचय सूची २०१९ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर पुना गाडगीळ अँड सन्स जळगावचे संचालक समीर मैंद्र, रमेश कडू पाटील, वसंतराव महाजन, जि. प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, व्ही. डी. पाटील, रोहिदास चौधरी, भागवत हरी पाटील, अनिल रामदास महाजन, प्रवीण चौधरी आदी उपस्थित होते.या परिचय मेळाव्यात १४१ युवती तर १७९ युवकांनी आपला परिचय करून दिला. व्यासपीठावरील मान्यवरांनी युवक-युवतींना समाजाच्या उत्कर्षासाठी सामाजिक कामांत सहभागी होण्याचे आवाहन केले. तर समाजातील विशेष प्रगतीची, विकासाची कामे केलेल्या मान्यवर समाज बांधवांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. तसेच आमदार राजूमामा भोळे व खासदार रक्षाताई खडसे यांचा भव्य मताधिक्क्याने विजय झाल्याबद्दल श्री लेवा गुर्जर प्रतिष्ठान तर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन क्रांती पाटील यांनी केले. प्रास्ताविक अॅड. प्रदीप महाजन यांनी तर आभार सुनील चौधरी यांनी मांनले. यशस्वीतेसाठी श्री लेवा गुर्जर सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामकाज पाहिले.

Protected Content