जळगाव प्रतिनिधी । शहरातील पी.एन. गाडगीळ कला दालनात दिनेश खैरनार आणि चेतन पाटील या कलावंताच्या कलाकृतीच्या प्रदर्शन सुरू झाले असून ते सर्वांसाठी खुले आहे.
दिनेश अशोक खैरनार यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्मधून कमर्शीअल आर्ट या विषयात पदवी संपादन केली असून त्यांच्या विविध कलाकृती या प्रदर्शनात प्रदर्शीत करण्यात आल्या आहेत. तर चेतन पाटील यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्मधून कला क्षेत्रातील स्नाकतोत्तमर पदवी घेतली असून ते गत १० वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पोर्ट्रेट हा त्यांचा आवडीचा विषय असून या प्रदर्शनामध्ये त्यांनी निर्मित केलेल्या याच प्रकारातील काही कलाकृती प्रदर्शीत करण्यात आल्या आहेत. यात त्यांनी दिवंगत भवरलालभाऊ जैन यांचे तैलरंगातील एक चित्र आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. तसेच त्यांनी पॉवर शेडींग आणि पेन्सील शेडींगमधील काही चित्रे येथे प्रदर्शीत केली आहेत.
२६ मार्चपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन पी.एन. गाडगीळ कला दालनात सर्वांसाठी खुले असून याचा रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन शैलेंद्र खैरनार आणि चेतन पाटील यांनी केले आहे.
पहा– दिनेश खैरनार व चेतन पाटील यांच्या प्रदर्शनाबाबतचा व्हिडीओ.