जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी देखील जळगावात युवतींसाठी विशेष दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 16 ऑगस्ट 2025 रोजी कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान (सागर पार्क) येथे ही दहीहंडी होणार आहे. यंदा या युवतींच्या दहीहंडीचे 17 वे वर्ष आहे.
दहीहंडीसारख्या मोठ्या उत्सवात पुरुषांप्रमाणेच युवतींचा सहभाग वाढावा आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ही दहीहंडी सुरू करण्यात आली आहे. मानवी मनोरे बनवणे या क्रीडा प्रकाराला महाराष्ट्र शासनातर्फे साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्रात ही एकमेव युवतींची दहीहंडी साजरी केली जाते, ज्यामुळे महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला जातो.

या दहीहंडी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वानुमते एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. कल्याणी नागूलकर यांची तर सचिवपदी प्रा. क्षमा सराफ यांची निवड करण्यात आली आहे.
समितीची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष: डॉ. कल्याणी नागूलकर, उपाध्यक्ष: डॉ. अनिता पाटील, लेफ्टनंट डॉ. हेमाक्षी वानखेडे, डॉ. कल्याणी मोहरील, सचिव: प्रा. क्षमा सराफ, स्वागत समिती प्रमुख: डॉ. सोनाली महाजन, लिना पवार, खजिनदार: निलम जोशी, सहसचिव: हर्षाली चौधरी, संध्या कांकरीया, प्रसिद्धी प्रमुख: यामिनी कुळकर्णी, सदस्या: चेतना नन्नवरे, प्रा. श्रीया कोगटा, क्रिस्टाबेल परेरा, या समितीच्या माध्यमातून युवतींच्या दहीहंडी उत्सवाचे नियोजन अधिक प्रभावीपणे केले जाईल, अशी अपेक्षा आहे.



