पारोळा तालुका मराठी शिक्षक महासंघाची कार्यकारिणी जाहीर

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाच्या पारोळा तालुका कार्यकारिणीची निवड ता.२३ सप्टेंबर रोजी पारोळा येथे संपन्न झाली. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाचे जळगांव जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अर्जुन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनानुसार पारोळा तालुक्याची कार्यकारिणी निवड करण्यात आली. मराठी विषयाचे तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षक प्रा अनिल पवार यांचेही मार्गदर्शन लाभले.

यावेळी तालुकाअध्यक्ष – प्रा भगवान वेडू सोनार , रा का मिश्र कनिष्ठ महाविद्यालय , बहादरपूर , तालुका उपाध्यक्ष उपाध्यक्ष – प्रा ईश्वर सदाशिव पाटील, डी एम पाटील उच्च माध्यमिक विद्यालय सावखेडे तुर्क , तालुका सचिव – प्रा. हिरालाल पुंडलिक पाटील डी. डी. नाईक उच्च माध्य आश्रमशाळा वसंतनगर, कार्याध्यक्ष – प्रा राम रमेश पाटील, किसान महाविद्यालय पारोळा . कोषाध्यक्ष – प्रा किशोर विठ्ठलराव पाटील ज्ञानदीप उच्च माध्य विद्यालय , पारोळा , संघटन सचिव – प्रा बाजीराव नथ्थू पाटील उच्च माध्य विद्यालय मंगरूळ , सल्लागार – प्रा अनिल लोटन पवार . किसान महाविद्यालय पारोळा , तालुका सदस्य – प्रा श्रीमती सिमा अमृतराव पाटील राजे संभाजी उच्च माध्य विद्यालय पारोळा , प्रा राजेंद्र गिरधर पाटील उच्च माध्य. विद्यालय देवगांव , प्रा चंद्रकांत भाऊसाहेब कापडे एन इ एस उच्च माध्य विद्यालय पारोळा , प्रा वरुण प्रभाकर पाटील उच्च माध्य विद्यालय मोंढाळे पिंप्री यांची निवड करण्यात आली. पारोळा तालुका मराठी शिक्षक महासंघाच्या नूतन कार्यकारिणीचे जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी , सदस्य , व तालुक्यातील शिक्षकांनी अभिनंदन केले . तसेच महासंघाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Protected Content