जळगाव प्रतिनिधी । यावल तालुक्यातील आदीवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी स्वराज्य कोळी समाज संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. व विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.
कोळी समाज बांधवांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी आपल्या नातेवाईक व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार २६ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही शौचालयासाठी गावातील रोडवर एकटी गेली होती. त्यावेळी गावातील दोन अल्पवयीन मुले व एका तरूण यांनी अल्पवयीन मुलीचे तोंड दाबुन शेजारच्या शेतात ओढून नेले व तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. या घटनेतील तीनही संशयित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी यासाठी खटला फास्ट कोर्टात मार्फत विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, संशयितांना कठोरात कठोर शिक्षा झाली नाही तर कोळी समाज बांधव आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर अध्यक्ष विजय मोरे, मोहन सोनवणे, आकाश सपकाळे, स्वप्नील साळुंखे, भागवत कोळी, लखन कोळी, दत्तात्रय कोळी, पंकज सोनवणे ललित कोळी, महेंद्र सपकाळे, गजानन कोळी, संदीप कोळी, दिनेश वाघ, सावन कोळी, महेश कोळी, पिंटू जोहरे, संतोष कोळी, प्रकाश बोरसे, ॲड. गणेश सोनवणे, समाधान मोरे, विजय सोनवणे, सुभाष सोनवणे, कैलास सपकाळे, भगवान कोळी, किशोर बाविस्कर, सुनिल ठाकरे, रविंद्र कोळी यांच्यासह कोळी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.