चाळीसगाव प्रतिनिधी । जागतिक वन दिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील ओढरे येथे ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनच्या वतीने आज शेणखत व मातीचे वापर करून सीड बॉल निर्मितीचा उपक्रम ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
आज जागतिक वन दिवस असल्याने जगभर उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील ओढरे येथे ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक राठोड यांनी मोठ्या संख्येने ग्रामस्थांना सोबत घेऊन शेणखत व मातीचे वापर करून सीड बॉल निर्मितीचा उपक्रम राबविला. अलिकडच्या काळात पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्याची हानी जगातील प्रत्येक व्यक्तीला जानवत आहे. त्यामुळे पर्यावरणावर सर्वांनी प्रेम करावा या उद्देशाने ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनने आज अनोखा उपक्रम राबवून पर्यावरणाचा सकारात्मक संदेश दिला आहे.
दरम्यान अशोक राठोड यांनी आंजन, चिंच, गुलमोहर, पळस, भोकर या वृक्षांच्या अनेक बियांचा संग्रह करुन सीड बॉल निर्मिती केली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग घेतला. याप्रसंगी राकेश गवळी, राहुल राठोड, प्रियंका गायकवाड, शितल जाधव, भारती जाधव, सोनाली चव्हाण, रुपाली पवार, रविंद्र पवार, साईराम राठोड, रिंकु राठोड, अंजली जाधव, शिवानंद राठोड, आकाश राठोड आदी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमा दरम्यान सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, विद्यार्थी अशा अनेक समविचारी लोकांनी एकत्र येऊन या उपक्रमाला यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.
jalgaon taluka news, jalgaon city news, jalgaon live news, jalgaon live, jalgaon news, chalisgaon news, chalisgaon news update, chalisgaon live news,