अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रताप मिल परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त जवानाचे बंद घराच्या मागचा दरवाजा उघडून घरातून मोबाईल आणि रोकड असा एकुण ७ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक अशी की, अमळनेर शहरातील प्रताप नगरात योगेश दंगल पाटील वय ४१ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते सेवानिवृत्त जवान आहेत. मंगळवारी १६ जुलै रोजी पासून त्यांचे घर बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर पाहून घरच्या मागचा दरवाजा उघडून घरातून ५ हजार रूपयांचा मोबाईल आणि २ हजारांची रोकड असा एकुण ७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना बुधवारी १७ जुलै रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. त्यानंतर त्यांनी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे हे करीत आहे.