पारोळा प्रतिनिधी । माजी पालकमंत्री तथा माजी आ. डॉ. सतीश भास्कररराव पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी स्वत: याबाबतची माहिती जाहीर केली आहे.
पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी स्वत:ला कोरोना झाल्याचे रविवारी घोषित केले. कोरोना संशयित लक्षणे जाणवल्याने त्यांनी अँटीजेन टेस्ट केली होती. यात ते पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. दरम्यान आपली प्रकृती उत्तम असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून ते पुढील उपचारासाठी नाशिकला रवाना झाले आहेत. तेथील हॉस्पीटलमध्ये डॉ. पाटील यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
शनिवारीच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण आणि पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील हे कोरोना पॉझिटीव्ह आले होते. या पाठोपाठ आता डॉ. सतीश पाटील हे देखील पॉझिटीव्ह आले आहेत.