जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी नगरसेवक तथा तेली समाज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेश चौधरी यांचे उपचार सुरू असतांना निधन झाले.
माजी नगरसेवक महेश चौधरी हे तेली समाजातील राष्ट्रीय पातळीवरील महनीय व्यक्तीमत्व म्हणून गणले जाणारे दिवंगत आर. टी. अण्णा चौधरी यांचे चिरंजीव होते. ते सध्या तेली समाज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणूनही उत्तम कामगिरी पार पाडली होती. भाजपचे कट्टर कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती.
अलीकडेच महेशभाऊंना हृदयविकाराचा झटका आला होता. यावर उपचार सुरू असतांनाच त्यांनी साडेसातच्या सुमारास शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच राजकीय, सामाजिक क्षेत्रातून संवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत. आज तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज जयंतीचे कार्यक्रम सुरू असतांनाच महेशभाऊ चौधरी यांच्या निधनाचे वृत्त आल्याने समाजावर शोककळा पसरली आहे. तर अनेक ठिकाणी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.