माजी आ. संतोष चौधरी यांची हकालपट्टी करा; जगन सोनवणे यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ येथील माजी आमदार संतोष चौधरी यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी संविधान आर्मी संघटनेचे अध्यक्ष जगन सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा आडवून मागणीचे निवेदन दिले आहे.

याबाबत माहिती अशी की, भुसावळातील जॉली पेट्रोल पंप जवळ संविधान आर्मी संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट यांच्यावतीने शुक्रवारी १७ डिसेंबर रोजी दुपारी राष्ट्रीय महामार्गावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अडवला ताफा आडवून भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करावी व झोपडपट्टी धराकांचे पुनर्वसन करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.

अधिक माहिती अशी की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. भुसावळ शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती देण्यासाठी जळगावहून दुपारी भुसावळात हजेरी लावली. भुसावळ शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार आगमन झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर संविधान आर्मी संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट चे जगन सोनवणे यांनी ताफा अडविला  व विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या संदर्भात संविधान आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे म्हणाले की, माजी आमदार संतोष चौधरी यांनी आमदारकीच्या निवडणूकीत माझ्या पाठीत खंजीर खूपसून आमदार होण्यापासून रोखलं आहे. यासह झोपडपट्टी धारकांना घरे देवून त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे.

 

Protected Content