Home क्राईम बिहारमध्ये ईव्हीएम मशीन फोडले ; एकाला अटक

बिहारमध्ये ईव्हीएम मशीन फोडले ; एकाला अटक


D527vo9U8AA3udO
 

पाटणा (वृत्तसंस्था) बिहारमधील सारण लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम फोडण्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान,या प्रकरणी रणजित पासवान नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

 

देशात पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच बिहारमध्ये मतदान प्रक्रियेला गालबोट लागले आहे. सारण लोकसभा निवडणुकींतर्गत सोनपूर विधानसभेच्या नयागावातील 131 नंबर मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन फोडल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे मतदान प्रक्रिया काही वेळासाठी खंडित करण्यात आली होती. या प्रकारानंतर नयागावातील मतदान केंद्र संख्या 131वरची मतदान प्रक्रिया खंडित करण्यात आली आहे. सारणच्या जागेवरून एनडीएचा सरळ सरळ महागठबंधनशी मुकाबला आहे. या जागेवरून लालूंचे नातेवाईक चंद्रिका राय महागठबंधनचे उमेदवार आहेत. तर एनडीएकडून राजीव प्रताप रुडी रिंगणात आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound