चोपड्यातील तरुणांसह डॉक्टरांचा जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांच्या सोबत अभ्यास दौरा

1b15dbe7 2702 4d16 be00 bab8a7e766da

 

चोपडा ( प्रतिनिधी ) शहरातील पाणी टंचाई आणि तालुक्यात दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी घसरत जात असल्याने पाण्याबाबत शहरात या पुढे मोठी टंचाई भासणार आहे. त्यामुळे भविष्यात पाणी कसे आडवायचे यासाठी येथील नवयुवक आणि शहरातील डॉक्टर ,प्राध्यापकांनी जलतज्ञ व शिरपूरचे पेंटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर यांच्या सोबत रविवारी शिरपूर तालुक्यातील बंधारे पाहणी दौरा केला .

 

 

चोपडा वासीयांना भविष्यात पाणी सुरळीत मिळेल का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे आपल्याच शेजारी असलेले शिरपूर तालुक्यात चोवीस तास पाणी आणि तेही आर ओ (क्युरिफाय) पाणी नगरपालिका देत आहे. त्या ठिकाणाचे आदर्श घेत आपणही काही प्रमाणात पाणी कसे आडवायचे? यासाठी येथील नवयुवक आणि शहरातील डॉक्टरर्स ,प्राध्यापक मंडळीनी सुरेश खानापूरकर यांच्या सोबत शिरपूर तालुक्यातील बंधारे पाहणी दौरा केला . चोपड्याची पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नवयुवकांनी आणि डॉक्टर, प्राध्यापक लोकांनी चंग बांधलाय की, होईल तितके काम करू, परंतु कामाला सुरुवात करायचीच आहे. यासाठी खानापूरकर साहेबांसोबत आज शिरपूर तालुक्यातील निमाझरी,वाडी, बोराडी, कुआ, अश्या अनेक गावांमधील बंधाऱ्याना भेट दिली.

 

 

यावेळी खानापूरकरांनी माहिती देत असताना सांगितले की, शिरपूर तालुक्यात 220 बंधारे खोदकाम केले आहेत. जवळपास 40 ते 60 फूट खोल आणि लांबी लाखो मीटर केले तरी मागील वर्षी पाऊस आला नाही. तरी ह्या वर्षाचे रब्बीचे पीक आम्ही घेतले. अगदी अल्पपाऊस झाला तरी या बंधाऱ्यामुळे खाली पाणी जमिनीत मुरलेले असल्याने आम्ही रब्बी घेऊ शकलो. माजी आमदार अमरिशभाई पटेल यांच्या अर्थसाहाय्याने आणि जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांच्या संकल्पनेतुन ही योजना आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांचा मोठा लाभ झाला आहे. आणि तरी देखील शेतकऱ्यांकडून एक रुपया न घेता कोट्यवधी रुपयांचे कामे केली आहेत. असे काम कुठल्याही आमदार करू शकत नाही. आजच्या घडीला शिरपूर तालुक्यात एकही शेतकरी आत्महत्या करू शकत नाही. पुढील ५० वर्ष आमच्या तालुक्याला पाण्याची कमतरता भासणार नाही ह्या वर्षी देवाच्या कृपेने जरा जास्त पाऊस झाले तर कोट्यवधी लिटर पाणी साठवण होणार आहे,असे अनेक शेतकऱ्यांनी बोलतांना सांगितले.

 

 

या अभ्यास दौऱ्यात चोपडा शहरातून विवेकानंद हॉस्पिटलचे संचालक डॉ विकास हरताळकर, प्रेरणा दर्पण फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ निर्मल टाटीया, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एन.पाटील, सामाजिक कार्यकर्ते सागर बडगुजर, राजेंद्र बडगुजर, प्रेरणा दर्पण फाउंडेशनचे सचिव व भारतीय जैन संघटनेचे विभागीय जनसंपर्क प्रमुख लतीश जैन, भारतीय जैन संघटनेचे चोपडा तालुकाअध्यक्ष क्षितिज चोरडिया, पत्रकार आर.डी. पाटील, विधी कॉम्प्युटरचे संचालक हिरेंद्र साळी, नवजीवन हॉस्पिटलचे संचालक नरेंद्र पाटील , साद माणुसकीची या संस्थे मार्फ़त महाराष्ट्रातील परभणी, लातूर, बीड, बुलढाणा, अकोला, औरंगाबाद, नाशिक, सिल्लोड, उसमनाबाद ,अहमदनगर, सातारा, सांगली, अश्या विविध जिल्ह्यातून स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी जवळपास १५० ते २०० लोक आली होती आणि तेथील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर हजर होते. चोपडा शहरालाही सुजलाम सुफलाम करायचे असेल तर यात नवयुवकांनी पुढे येऊन आपले सहकार्य दयावे. सर्वांच्या सहकार्यानेच चोपडा शहराचे चित्र बदलू शकते. त्यासाठी शहरातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन होईल ती आणि शक्य होईल तेव्हढी मदत करण्याची भावना ठेऊन पाणी आडवा पाणी पाणी जिरवाचा कार्यक्रम करू शकतो, असे आवाहन केले आहे

Add Comment

Protected Content