वासुदेवानंद महाराजांच्या जयंतीनिमित्त सोमवारपासून कार्यक्रम

WhatsApp Image 2019 08 18 at 7.07.30 PM

भुसावळ, प्रतीनिधी | येथील नाहाटा महाविद्‍यालयामागील गायत्री नगरातील उपासना केंद्रात वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा जयंती उत्सव दि. १९ व २० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात सोमवार  दि. १९ रोजी सकाळी ४ ते ७ नामस्मरण, ७ ते ८ आरती प्रसाद तर मंगळवार दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ अभिषेक, दुपारी ३ ते ५ भजन, सायंकाळी ५.१५ ते ५.४५ पाळणा, सायंकाळी ५.४५ ते ६.१५ प्रवचन, ६.३० ते रात्री ८ पालखी सोहळा, रात्री ८.१५ ते ९.१५ दर्शन व भोजन प्रसाद व रात्री शेजारती असे कार्यक्रम होतील. तरी या कार्यक्रमांचा दत्तसेवकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन सुशिल कुळकर्णी, दिपक पाठक व मिलींद कुळकर्णी यांनी केले आहे.

Protected Content