भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माहिती तंत्रज्ञानामुळे जगामध्ये अमुलाग्र बदल झालेला आहे. बदलत्या काळात संगणकाचा बोलबाला आहे. ज्ञानदान करण्याच्या पद्धतीही बदललेल्या आहे. बदलत्या काळातही गुरुचं महात्म्य आणि मोठेपण अजूनही कमी झालेलं नाही. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे यांनी आज बोलताना केले.
गुरुपौर्णिमेनिमित्त भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. उत्तम सुरवाडे आणि पर्यवेक्षक श्रीमती शोभा तळले, यांच्या शुभहस्ते संत मीराबाईची मूर्ती प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी छोटे कानी मनोगत उपप्राचार्य उत्तम सुरवाडे यांनी व्यक्त केले. ‘गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय’ या शब्दात संत कबीरांनी गुरूंचं मोठेपण अधोरेखित केले आहे. गुरु ईश्वर तात माय गुरुविण जगी थोर काय ओलांडून ‘विश्वजाय गुरवे नमः’ जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर गुरूंच्या ज्ञानेश्वर मार्गदर्शनासपुरे माणूस यशस्वी होऊ शकत नाही. या शब्दात गुरूंचा मोठेपण त्यांनी सांगितलं. याप्रसंगी समन्वयक, विभाग प्रमुख, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.