जळगाव प्रतिनिधी । पॅकेज टूर्सच्या व्यवसाय कार्यरत असण्या-या व्यक्तींना योग्य मागदर्शन आणि मानसिक पाठबळ मिळावे, या हेतूने जागतिक पर्यटनदिनाच्या दिवशी जळगाव ट्रॅव्हल एजंट असोसिएशनची स्थापना करण्यात आलेली आहे.
जळगाव ट्रॅव्हल एजंट असोसिएशनची स्थापना शुक्रवारी (दि.28) रोजी करण्यात आली असून पॅकेज टूर्सच्या व्यवसायकांना जीएसटी (GST) याविषयांवर सेमिनार घेण्यात आला आणि त्यावर अनुकूल टूर्सचे परेश पाठक यांनी ताजच्या सदस्यना मार्गदर्शन केले होते. असोसिएशनचा अध्यक्षपदी जेष्ठ सदस्य दीपक मणियार, सचिवपदी कपिल पाठक, खजीनदारपदावर नरेंद्र झवर आणि प्रसिध्दी प्रमुख पदावर राजेश मलिक यांची निवड करण्यात आली. यावेळी अनुकूल टूर्सचे परेश पाठक, दुरी हॉलिडेचे विश्वेश पवार, बीयोन्ड वेकेशनचे प्रीतेश वेद, आदिमिता हॉलिडेचे रोहित संघवी, फ्लाय २ फन हॉलिडेचे राजेश मलिक, वंडर वेकेशनची रचना पलोड, फिरा हॉलिडेचे पियुष सोनवणे, ट्रॅव्हल न जॉयचे आशिष पाटील, कलर वेकेशनचे सन्नी कावडीया आणि योगेश ट्रॅव्हलचे राहुल पाटील हे उपस्थीत होते.