जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात व विद्यार्थ्यांच्या लेझीम नृत्याच्या जल्लोषांमध्ये श्री गणेशाची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षक वृंद, पालक उपस्थित होते. सुरुवातीला बैलगाडीमध्ये श्री गणेशाची मूर्ती ठेवण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा मेहरूणचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी श्री गणेशाची आरती केल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला.
विद्यार्थ्यांनी नृत्य करून नगरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर ढोल ताशांच्या गजरात देखील विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. यानंतर संपूर्ण मेहरूण मधून मिरवणूक काढल्यानंतर अखेर श्री संत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी संस्थेच्या संचालिका अर्चना नाईक, सचिव मुकेश नाईक, मुख्याध्यापिका शितल कोळी, स्वाती नाईक, उपशिक्षिका उज्वला नन्नवरे, साधना शिरसाट, रूपाली आव्हाड, आम्रपाली शिरसाट, साक्षी जोगी, दिव्या पाटील, सोनाली जाधव, सोनाली चौधरी, पुनम निकम, कोमल पाटील, नयना अडकमोल, जयश्री खैरनार, शिल्पा कोंगे, योगिता सोनवणे, दिनेश पाटील यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.