एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व ठाकरे परिवाराविषयी अर्वाच्च भाषेत व गंभीर स्वरूपाचे आरोप करणाऱ्या रामदास कदम यांच्या प्रतिमेस जोडे मारून तसेच पुतळा जाळून एरंडोल तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने धरणगाव चौफुली येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी “ज्या पक्षाने आपल्याला ओळख दिली ज्या ठाकरे परिवाराच्या आशीर्वादाने गेली पन्नास वर्षे ज्यांनी पद उपभोगली आणि तेच आता गद्दारी करून पक्षनेतृत्वावर खालच्या दर्जाची टीका करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या व शिवसेना या चार अक्षरांच्या पुण्याईने मंत्रीपदापर्यंत पोचून ज्यांनी सत्तेची फळे चाखली. आपल्या वारसदारांना राजकारणात लाभाची पदे मिळवून दिली; आज तेच गद्दार कमावलेल्या बेकायदेशीर संपत्तीमुळे ईडीच्या भीतीने पक्षनेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसून निघून गेले. त्यांना पक्षप्रमुखांवर बोलण्याची नैतिकता तरी आहे का…?” अशी घाणाघाती टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी यावेळी केली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून रास्तारोको केला.
एरंडोल तालुक्यात मागील एक महिन्यापासून सतत झालेल्या अति पावसामुळे शेतकऱ्यांचे कापूस, मका, सोयाबीन, उडीद, मुग, ज्वारी व बाजरी या सर्व पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वारा वादळामुळे सर्व पिके आडवी पडले आहेत. कापूस पिकाला तर कोम आले असून संपूर्ण पीक वाया जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा ओढवलेल्या आस्मानी संकटांमुळे तालुक्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. तरी त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी शासनाने एरंडोल तालुक्यात सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा आणि बळीराजाला न्याय द्यावा. या आशयाचे निवेदन नायब तहसीलदार किशोर माळी यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले.
याप्रसंगी समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष हिंमत पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, मा.जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन, शिवसेनेचे पारोळा तालुका प्रमुख प्रा.आर.बी.पाटील, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख विवेक पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन, शिवसेनेचे पारोळा शहर प्रमुख अशोक मराठे, युवासेनेचे तालुका समन्वयक कमलेश पाटील, युवासेनेचे शहर प्रमुख अतुल महाजन, माजी नगरसेवक सुभाष मराठे, माजी नगरसेवक सुनील चौधरी, माजी नगरसेवक संजय महाजन, माजी नगरसेवक रुपेश माळी, माजी नगरसेवक दशरथ चौधरी, माजी नगरसेवक राजेंद्र ठाकूर, माजी नगरसेवक प्रमोद महाजन, रेवानंद ठाकूर, सुनील मराठे,गोपाल देशमुख, परेश बिर्ला, गजानन महाजन, अमोल भावसार, कुणाल पाटील, गोपाल महाजन, महेश महाजन, विकी खोकरे, प्रदीप राजपूत, आरिफ मिस्तरी, नासिर शेख, गुड्डू चौधरी, अमोल भोई, दिनेश राठोड, भारत चौधरी, रतन पाटील, मंगेश चौधरी, धनराज आहिरे, देवीदास पाटील, ज्ञानेश्वर बडगुजर, राजू जोगी, पंकज चौधरी, मनोज माळी, बाळू सोनार, अशोक बडगुजर, सुरेश महाजन, भिकन बैरागी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.