एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल मनसे तालुकाध्यक्ष विशाल सोनार यांनी मुंबई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुष्णकुंज निवासस्थानी जाऊन कार्यकर्त्यांसोबत भेट घेतली.
यावेळी तालुक्यातील विविध समस्यांबद्दल तसेच संघटनेच्या बांधणीसाठी काय करावे लागेल याबद्दल राज ठाकरे यांच्या सोबत चर्चा झाली व जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्षपद व संपर्क अध्यक्ष रिक्त असल्याचे देखील विशाल सोनार यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी राज ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्ते तथा एरंडोल तालुकाध्यक्ष विशाल सोनार यांना संघटन वाढवा, असा सल्ला उपस्थित कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना एरंडोल यायचे निमंत्रण दिले व त्यांनी मी महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यावर तर एरंडोलला नक्की भेट देईल, असा शब्द दिला.