जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता पर्व दिनांक ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ व सामाजिक न्याय पर्व दि, ११ एप्रिल ते १ मे यादरम्यान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राबविण्यात येत आहे.
समता पर्वतर्गत सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे विविध कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन, व्याख्यान योजनांची प्रचार प्रसिद्धी तसेच प्रमुख वक्त्यांचे व्याख्यान, समता रजनी कार्यक्रम तसेच इतर कार्यक्रम यांचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण जळगाव यांच्यामार्फत आयोजन करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने महिला मेळावा त्याअंतर्गत महिलांना कायदेविषयक तसेच आरोग्य विषयक मार्गदर्शनाकरिता काही प्रमुख व्याख्याते व मार्गदर्शक सदर मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत.
सामाजिक न्याय भवन समाज कल्याण कार्यालय, जळगाव येथेही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा उद्या जाहिर केली जाणार असल्याचे सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी सांगितले.