भुसावळ, प्रतिनिधी | केवळ कायदे आणि नियम करून पर्यावरणाचे संरक्षण होणार नाही. नव्या पिढीमध्ये पर्यावरण संरक्षणासंदर्भात रुची निर्माण होऊ शकेल. वृक्षारोपण, प्रभात फेरी, चित्रकला, कविता, लेख या विविध माध्यमातून अभिव्यक्त होत पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती गरजेची असल्याचे शिवसेना शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी मत व्यक्त केले.
ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पर्यावरण जनजागृती मोहिमेप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी उपशहरप्रमुख धनराज ठाकुर, युवासेना शहर प्रमुख सुरज पाटील, युवासेना शहर चिटणीस मयुर जाधव, नाना ठाकुर, आशिष सैतवाल, म्रुगेन कुलकर्णी, निखिल बऱ्हाटे, गिरीश जंजाळकर, प्रणव गायकवाड, रितेश झांबरे, तेजस तिवारी, सचिन चौधरी उपस्थित होते.युवासेना पक्ष प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांनी पर्यावणावर लक्ष केंद्रित करण्याचा आदेश दिलेला असून त्याअनुषंगाने पुढील दोन महिन्यात मोहिमेला व्यापाक स्वरुप देण्यासाठी पर्यावरण जनजागृती करुन चळवळ गतीमान करण्याचा निर्धार करण्यात आला. या मोहिमेची सुरुवात आज दिनांक २७ जुलै पासून जामनेर रोड परिसरातून करण्यात आली. उद्यापासून वरणगाव रोड, खडका रोड, गंगाराम प्लॉट, विठ्ठल मंदिर वार्ड, बाजार वार्ड, बद्री प्लॉट, सुरभी नगर परिसरात राबवली जाईल. नागरिकांमध्ये मोहिमेचा सकारात्मक संदेश जावून त्यांचा सहभाग वाढवा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
भूगर्भातील पाणी टिकवण्याचा संदेश:
भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत कमी होत असून पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरवले तर शाश्वत विकास करता येईल. याबद्दल परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्षारोपण बाबतीत जनजागृती करण्यात आली. हवा आणि ध्वनी प्रदूषणाच्या समस्येवर जनजागृती केली गेली. परिसरात २० ठिकाणी वृक्षारोपण करून नागरिकांना त्याचे पालकत्व देण्यात आले आहे.