जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तुकाराम वाडी परिसरात राहणाऱ्या तरूणांनी राज ठाकरे यांच्या कार्यपध्दतीवर विश्वास ठेवून ३२ तरूणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेने सोबत अजून काही तरूणांना आणण्याचा प्रयत्न करून असा संकल्प देखील यावेळी तरूणांनी केला आहे.
याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष, किरण तळेले, उपमहा नगराध्यक्ष ललित शर्मा, सतीश सैंदाणे, शहर सचिव महेंद्र सपकाळे, विभाग अध्यक्ष दुर्गेश पन्हाळे, सागर बाविस्कर उपस्थित होते.
प्रवेश पक्ष सोहळ्यात गणेश क्षीरसागर, पियुष भालेराव, चैतन्य भालेराव, कुणाल कोळी, सूर्यकांत धनगर, भूषण पाटील, प्रणव ठाकूर, अखिल बहारे, पियुष धनगर,दुर्गेश परदेशी, राज राजपूत, शुभम चौधरी दिवेश ठाकूर, गोरख राजपूत, पियुष ठाकूर, अमन बाविस्कर, गजानन शिरसागर, किरण गोसावी, निखिल पाटील, हर्षल हिरे, गोपाल पाटील, वैभव पाटील, प्रवीण शिंदे, राहुल चव्हाण, सागर अंदुरे,रोहन पाटील, राजकिरण राजपूत, हेमंत पाटील, शुभम देवरे, कल्पेश परदेशी यांनी प्रवेश केला आहे. तरुणांच्या प्रवेशाचे नियोजन शहर सचिव महेंद्र सपकाळे व जयेश चौधरी चेतन पवार यांनी केले.