पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरातील नगरपरिषदेमार्फत दिनांक 13 ते 15 मार्च या कालावधीत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन किशोर चव्हाण मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद पारोळा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी यामिनी जटे कर निर्धारण व प्रशासकीय सेवा सुभाष चिंतामण थोरात जनगणना व निवडणूक विभाग प्रमुख राहुल साळवे लेखाधिकारी दीपक महाजन अंतर्गत लेखा परीक्षक भूषण महाजन शहर तांत्रिक कक्ष अधिकारी शुभम कंखरे शहर समन्वयक चंद्रकांत महाजन सहाय्यक प्रकल्प अधिकारी राहुल प्रजापती समुदाय संघटक मनीषा चौधरी अध्यक्ष अर्चना पाटील, उपाध्यक्ष पुनम पाटील, सचिव भागीरथी महिला शहर स्तर संघ पुष्पा भोकरे रिया महिला वस्ती स्तर संघ इत्यादी उपस्थित होते. सहभागींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. प्रशिक्षणास पारोळा शहरातील लाभार्थींनी तीन दिवस कार्यक्रमात उपस्थिती देऊन प्रशिक्षणाचा लाभ घेतला स्वयंरोजगार घटकाच्या मार्फत ज्या लाभार्थ्यांना बँकेकडून कर्ज प्राप्त झालेली आहे. अशा लाभार्थ्यांना उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उद्योग व्यवसाय विषयी तज्ञ प्रशिक्षक दिलीप ठाकूर, संदीप केदार जिल्हा उद्योग केंद्र ट्रेनर यांनी प्रशिक्षण दिले कार्यक्रमात २५ लाभार्थ्यांची उपस्थिती होती मुख्याधिकारी तथा प्रशासक किशोर चव्हाण यांनी महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी उद्योग महत्त्वाचा असून महिलांनी स्वतः सक्षम होऊन लहान उद्योगापासून मोठे उद्योजक व्हावे असे आवाहन केले.
महिलांना उद्योग उभारण्यासाठी बँकांनी आर्थिक मदत करावी तसेच महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची बाजारपेठ निर्माण व्हावी असे मार्गदर्शन केले मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री किशोर चव्हाण यांच्या हस्ते 25 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले समारोप प्रसंगी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शाखा प्रबंधक जितेंद्र चुंबाळकर,योगेश पाटील तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय अधिकारी सागर मिसाळ ग्राहक व बँक मित्र श्री प्रकाश पाटील यांची विशेष उपस्थिती होती याप्रसंगी वरील दोन्ही बँक अधिकाऱ्यांनी शासकीय योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची योग्य वेळेत परतफेड केल्यास आपणास अजून इतर शासकीय योजनांची दारे कशी उघडतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल प्रजापती समुदाय संघटक तेजस्विनी चौधरी, योगिता चौधरी, सुनीता चौधरी, विजया चौधरी संगीता वाडीले व इतर महिला बचत गटातील सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन व सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत महाजन यांनी केले