अंबिलहोळ येथील भंडारा कार्यक्रमात भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील आंबीलहोळ तांडा गावात केशव बाबा व रामदेव बाबा यांचा भंडारा करण्याची दीडशे वर्षांपासून परंपरा असून ऋषिपंचमीनिमित्त हा भंडारा करण्यात आला.

आंबीलहोळ येथील रामदेवजी बाबा यांचा भंडारा व आरतीला विशेष महत्त्व आहे. सकाळी गावातून रामदेवजी बाबा यांची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी या शोभायात्रेमध्ये महामंडलेश्वर जनार्दन स्वामी व परमपूज्य श्याम चैतन्य महाराज उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करून बगीवर मिरवणूक करण्यात आले. हजारोच्या संख्येने नागरिक व भक्तगण महाराष्ट्र उत्तर प्रदेशातून या भंडाराला उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे लाभ नागरिकांनी घेतला. अंबिलहोळ येथील रामदेवबाबा मंदिराची मंदिराची ओळख ही जागृत देवस्थान म्हणून असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविक भंडारानिमित्त हजेरी लावली होती भंडारा व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Protected Content