गोदावरी एमबीए महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी एमबीए महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला.

 

महाविद्यालयाचे संचालक डॉ.प्रशांत वारके यांनी कार्यक्रमाची सुरवात सरस्वतीच्या प्रतिमेस पूजन करून केली. यावेळी विद्यार्थ्यांना ते म्हणाले की  शिक्षणाशिवाय उत्कर्ष होणार नाही याची जाणीव ठेवून जळगाव जिल्हामधील आर्थिदृष्टया कमकुवत असलेल्या, होतकरू, मेहनती व इतर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी महाविद्यालयाची निर्मिती झाली आहे. श्रम संस्कार या महाविद्यालयाने जपले आहे. या महाविद्यालयातून ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेले आहे त्यांनी स्वतःच्या विकासासोबत समाजाचाही विकास केला आहे व समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. याबरोबरच बरेच विद्यार्थी परदेशामध्ये आपली सेवा विविध कंपन्यांमध्ये देत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्युनिअर ला विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी मदत व मार्गदर्शन केले अशा विद्यार्थ्यांचे डॉ. प्रशांत वारके यांनी खूप कौतुक केले. आपले ज्ञान नेहमी अद्यायावत करा, कामाठिकाणी प्रामाणिक रहा व जबाबदारीने काम करा असे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले.

 

बऱ्याच वर्षानंतरची शिक्षक – विद्यार्थी -विद्यार्थिनिंच्या या भेटीने सर्वजण आनंदून – सुखावून गेले होते. आपल्या शिक्षकांनी त्यांच्या ज्ञानाची मोठी गुंतवणूक करून विद्यार्थ्यांच्या जीवनाला चांगला आकार दिला. या गुरुऋणातून उतराई होणे अशक्य आहे अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

 

याप्रसंगी आपले अनुभव सांगताना विद्यार्थी भारावून गेले होते. सदर मेळाव्यास २००४ ते २०२१बॅच मधील बरेच विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटनेच्या सर्व मेंबर्स ची सदर कार्यक्रमास उपस्थिती होती. सदर कार्यक्रमास कोरोना काळात पास झालेल्या बॅच म्हणजे २०१८-२०, २०१९-२१ मधील विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ सुद्धा घेतला गेला. यावेळी विद्यार्थ्यांनी गायन, ग्रुप डान्स इ. मध्ये सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांसाठी डीजे पार्टी व स्नेहभोजन आयोजित केलेले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्रा.प्राजक्ता पाटील व प्रा. भाग्यश्री पाटील यांनी मेहनत घेतली.

 

यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. आफ्रिन खान, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. दिपक दांडगे, श्री. मयुर पाटील,  गौरव पाटील, सागर चौधरी, गणेश सरोदे, प्रशांत किरंगे, जीवन पाटील, प्रफुल्ल भोळे, रुपेश पाटील, घनश्याम पाटील, रुपेश तायडे,  जयश्री चौधरी, भावना ठाकूर इ. कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content