बेंडाळे महिला महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयावर कार्यशाळा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात विद्यापीठ अंतर्गत एक दिवसीय प्रथम वर्ष कला अर्थशास्त्र अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा घेण्यात आली.

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि  लेवा एज्युकेशनल युनियन संचालित डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय प्रथम वर्ष कला अर्थशास्त्र अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाच्या माननीय प्राचार्य डॉ. गौरी राणे यांनी भूषविले.

 

अध्यक्षीय विचारामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमा-संदर्भात येणारे भविष्यातील बदल हे आपल्याला स्वीकारावे लागणार आहेत त्यानुसार अभ्यासक्रम हा नाविन्यपूर्ण असावा असे मार्गदर्शन मा.प्राचार्य,डॉ. गौरी राणे यांनी केले. कार्यशाळेचे प्रमुख अतिथी डॉ.प्रमोद पवार (प्र.अधिष्ठाता,मानव्य विद्याशाखा- क.ब.चौ. उ.म.वि. जळगाव) हे होते, डॉ. पवार यांनी मार्गदर्शन करीत असतांना म्हटले कि, यु.जी.सी. मार्फत सुरु करण्यात आलेली  Choice Base Credit System नुसार  विषयनिहाय अभ्यासक्रमामध्ये झालेले बदल तसेच नवीन शैक्षणिक धोरणात येऊ घातलेले बदल त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम हा कौशल्य आधारित झाला पाहिजे तरच आपण विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकू मार्गदर्शन केले.

 

प्रथम सत्राच्या  अध्यक्षीय स्थानी डॉ. मोहन पावरा (व्यवस्थापन परिषद सदस्य क.ब.चौ.उ.म.वि.,जळगाव) हे होते. यांनी देशाच्या विकासाच्या दृष्टीने अर्थशास्त्र या विषयाचे महत्व सांगितले त्यानुसार अभ्यासक्रम हा घटक खूप महत्वाचा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. द्वितीय सत्राचे अध्यक्ष मा.डॉ. मनोजकुमार गायकवाड (चेअरमन,अभ्यासमंडळ क.ब.चौ.उ.म.वि., जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम वर्ष कला( अर्थशास्त्र ) या वर्गाच्या  अभ्यासक्रम संदर्भात दोन समित्या नेमण्यात आलेल्या होत्या समित्यांनी अभ्यासक्रम पुनर्रचित करून कार्यशाळेमध्ये अभ्यासक्रम प्रस्तुत केला   कार्यशाळेतील प्राध्यापकांनी विषयातील  त्रुटी दूर करून अभ्यासक्रम पुनर्रचित केला. कार्यशाळेचे संपूर्ण आयोजन म्हणून जबादारी हि कार्यशाळेचे समन्वयक डॉ.विनोद नन्नवरे यशस्वी रित्या पार पाडली.

 

समारोप प्रसंगी कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. आणि महाविद्यालयाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. विनोद नन्नवरे आणि सूत्रसंचालन प्रा. निलेश कोळी,प्रमुख पाहुण्यांचा परिचय व आभार डॉ.सचिन कुंभार तसेच  कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न प्रा.ज्योती पाटील,प्रा.कोमल चौधरी यांनी केले. सदर कार्यशाळेला चेअरमन, अभ्यासमंडळ,व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच सर्व BOS सदस्य आणि क.ब.चौ.उ.म.विद्यापीठ संलग्नित जळगाव, धुळे, नंदुरबार या  तीनही जिल्यातील   विविध महाविद्यालयातील  प्राध्यापक कार्यशाळेला उपस्थित होते.

 

Protected Content