चिनावल येथील गणेश विसर्जनासाठी तगडा बंदोबस्त

सावदा ता रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चिनावल येथे आज गणेश विसर्जन होणार असून यानिमित्त तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

आज म्हणजेच सोमवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी चिनावल येथे गणेश विसर्जन होणार आहे. चिनावल येथील गणेश विसर्जन मिरवणूक ही परिसरात प्रसिद्ध आहे या मिरवणुकीत गावातील १५ मंडळे सहभागी होणार आहे ह्या अनुषंगाने गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी एक महिन्या पासुनच नियोजन आखत गणेश मंडळ पदाधिकारी व गावातील पदाधिकारी याना सोबत घेत ४ बैठका ही घेतल्या आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावत गावातून रुट मार्च करत जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शना खाली रविवारी गावात आढावा घेण्यात आला.

आजच्या मिरवणूक मार्गावर ३० सी सी टी व्ही कॅमेरे, पूर्ण मार्गावर मर्क्युरी लाईट, फ्लॅट लाईट व्यवस्था, मद्य तपासणी, आर टी ओ पथक, यांचे सह स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डी वाय एस पी राजकुमार शिंदे, सावदा पोस्टे चे सपोनि जालिंदर पळे, पो उप निरिक्षक विनोद खाडबहाले यांचे सह २ डी वाय एस पी, १५ सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उप निरिक्षक, १ एस आर पी प्लॉंटून, १आर सी पी प्लॉंटून ,३ स्ट्रायकीग फोर्स ,१० फॉंरेस्ट कंमाडो, १०० पोलिस कर्मचारी, १०० होमगार्ड, एल सी बी पथक, गोपनीय पथक, एवढा मोठा पोलीस फौजफाटा राहणार आहे.

मिरवणुकीवर ड्रोन कॅमेरा, दुर्बिण, बीडीएस पथक, डेसिबल मिटरचे लक्ष राहणार आहे आजच्या विसर्जन मिरवणुक आनंदाने व शांततेने पार पाडण्याचे आवाहन करत डीवायएसपी राजकुमार शिंदे, सावदा पोस्टे चे सपोनि जालिंदर पळे यांनी माहिती दिली. सदर वेळी चिनावल पोलिस पाटील निलेश नेमाडे हे उपस्थित होते.

Protected Content