अभियंता दिनानिमित्त अभियंता गौरव व पुरस्कार वितरण (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 15 at 2.47.13 PM

जळगाव प्रतिनिधी | आज अभियंता दिनानिमित्त जळगाव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढीतर्फे अभियंता गौरव पुरस्कार वितरण सोहळा नियोजन भवनात आयोजन करण्यात आला होते. यात भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वश्वेराय्या ‘अभियंता’ गौरव पुरस्कार चौघांना देऊन गौरविण्यात आले. तसेच भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वश्वेराय्या ‘विशेष’ गौरव पुरस्कार चौघांना देण्यात आला. यासोबतच गुणवंत सभासद पाल्य, सेवानिवृत्त अभियंता यांचा सत्कार करण्यात आला.

 

या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे नदीजोड प्रकल्प शासनाचे सल्लागार व्ही. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता इंजि. आनंदकुमार मोरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अधीक्षक अभियंता सा. बा. मंडळ जळगावचे इंजि. प्रशांत सोनवणे, ज. जि. शासकीय साहेबराव पाटील, शासकीय तांत्रिक तंत्रनिकेतन जळगावचे प्राचार्य डॉ. इंजि. महेंद्र इंगळे हे उपस्थित होते.यावेळी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियंता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात इंजि. राज्यातील नदी जोड प्रक्ल्प प्रमुख वसंतराव पाटील , सहाय्यक कार्यकारी अभियंता इंजि. मनोज ढोकचौळे, शाखा अभियंता इंजि. विश्वनाथ विश्व आनंद तावडे,सहाय्यक अभियंता इंजि. जितेंद्र नेहते यांना गौरव पुरस्कार देण्यात आला. तर बारामती तालुक्यातील जळोची येथील मॅरेथॉनपटू लता करे, युवा भारूडकार आरळी बु || त. तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील कु. कृष्णाई प्रभाकर उळेकर, गडचिरोली येथील ‘कुर्माघर’ प्रथेवर कामकरणारी स्वयंसेवी संस्था’ स्पर्श’ चे डॉ. दिलीप बारसागडे, रावेर येथील खेलो इंडिया खेलो युथ गेम्समध्ये ‘भारोत्तोलन’ सुवर्णपदक विजेता अभिषेक महाजन यांचा भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ‘विशेष’ गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर गुणवंत सभासद पाल्यांचा तसेच सेवानिवृत्त अभियंता सभासदांचा सत्कार
करण्यात आला.

Protected Content