श्री स्वामिनारायण मंदिरात महाविष्णू यागची समाप्ती

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री स्वामिनारायण मंदिर जळगाव प्राणप्रतिष्ठा महोत्सवा अंतर्गत १३ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता महाविष्णू यागची समाप्ती वेदोक्त मंत्रोच्चारात संपन्न झाली.

त्यात प्रथम सकाळी ८ वाजेला सर्व ४० यजमानांनी शास्त्रोक्त पद्धतीने कलश पूजन करण्यात आले. नंतर न्यासविधी संपन्न झाला. त्यात गणेशजी, पार्वती, वास्तुदेवता आणि नवग्रहांची पूजा विधी त्यात पाद्य पूजा त्यात गंध, फुले, दुर्वा, दर्भ, सातू, मोहरी, तीळ आणि अक्षदा अर्पण करण्यात आल्या. नंतर आचमन केले. आणि मग दही, मध, दूध, साखर यांनी अभिषेक करण्यात आला. पुष्पोदनान, दर्पण, पत्रपूजा, कुंकूमार्चन याप्रमाणे शास्त्रोक्त विधी करण्यात आला. नंतर हरिकृष्ण, राधा, लक्ष्मीनारायण देवतांची यथोसांग पूजा केली.

याप्रसंगी सामवेद, अथर्ववेद,यजुर्वेद यातील मंत्रोच्चाराला सुरुवात झाली. त्यानंतर १०१ स्वामिनारायण भगवंतांची परमहंस संतांचे जप सुरू झाले, सोबत भगवान विष्णू सहस्त्र जप साधना सुरू झाली. नंतर स्वामिनारायण भगवंतांची आरती झाली. शेवटच्या सत्रात महाविष्णू याग संदर्भात पूर्णाहुतीच्या विधी सुरू झाल्या. त्यात सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद यातील दहा दहा असे ४० ब्राह्मणांनी मंत्रोच्चारास सुरुवात केली. त्यासाठी सुमारे ६० मिनिटे लागली. नंतर १० संतांनी पूर्णाहूतीच्या विधीत सहभाग घेतला. नंतर यजमानांनी सदर पूर्णाहुतीच्या विधीस सहभाग घेऊन शेवटी मंत्रपुष्पांजलीने त्रिदिनात्मक विष्णूयागची समाप्ती झाली.

Protected Content