Home Cities जळगाव मराठा समाजाच्या विकासासाठी आर्थिक महामंडळाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर – नरेंद्र आण्णासाहेब पाटील

मराठा समाजाच्या विकासासाठी आर्थिक महामंडळाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर – नरेंद्र आण्णासाहेब पाटील


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक बँकांनी पुढाकार घेवून कर्जपुरवठा करावा, अशी मागणी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांनी केली आहे.

मराठा समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनातर्फे अनेक योजना उपलब्ध असून, त्याचा लाभ समाजातील गरजू आणि होतकरू युवक-युवतींना मिळावा यासाठी बँकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. महामंडळाच्या योजनांतर्गत कमी व्याजदरात कर्जसुविधा देण्यात येते, मात्र अनेक ठिकाणी कर्ज वितरणात विलंब होत असल्याने लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याबाबत अधिक बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले की, “मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आर्थिक पाठबळ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक बँकांनी अधिक सहकार्य करून महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यास मदत करावी.” सरकारच्या या योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्यास मराठा समाजातील अनेकांना आर्थिक स्थैर्य मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound