Home Cities जळगाव सिंधी समाजाचे श्रद्धास्थान हजुरी रूप साई साधाराम साहेब यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली 

सिंधी समाजाचे श्रद्धास्थान हजुरी रूप साई साधाराम साहेब यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सिंधी समाजातील पूजनीय संत परमपूज्य हजुरी रूप साई साधाराम साहेब यांच्या निधनाने संपूर्ण सिंधी समाजावर शोककळा पसरली असून जळगाव शहरात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. परवा Singapore येथे त्यांचे देहावसान झाले होते. त्यानंतर आज सिंध प्रांतात त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. या पार्श्वभूमीवर जळगावातील संत सतराम धाम व समस्त सिंधी समाजातर्फे अंतिम दर्शन व श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील बाबा हरदास राम समाज मंदिर येथे झालेल्या श्रद्धांजली सभेला सिंधी समाज बांधवांसह राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहात अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी हजुरी रूप साई साधाराम साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. समाजाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक जडणघडणीत त्यांचे योगदान मोठे असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

या श्रद्धांजली सभेला आमदार Raju Mama Bhole, महापौर Deepmala Kale, केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरत दादा अमळकर, जळगाव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सागर चित्रे, नगरसेविका सुचिता हाडा, रमेश मतानी, गटनेते प्रकाश बालानी, अमरभाई कुकरेजा, राजेश मलिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी संतांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

सिंधी समाजात हजुरी रूप साई साधाराम साहेब यांना अत्यंत आदराचे स्थान होते. समाजातील धार्मिक एकता, मानवसेवा आणि अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या निधनामुळे समाजाने एक आध्यात्मिक आधारस्तंभ गमावल्याची भावना श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, संतांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जळगाव शहरातील सिंधी समाज बांधवांनी आपली सर्व व्यापारी आस्थापने दिवसभर बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. शहरातील अनेक भागांत शोकमय वातावरण पाहायला मिळाले.


Protected Content

Play sound