चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करणाऱ्या तालुक्यातील खेडगाव येथील एकूण १८ वीजग्राकांवर महावितरणने पाच लाखांचा दंड ठोठावला आहे.
वीजेची चोरी करणाऱ्यांनी दंड मुदतीच्या आत भरले नाही. तर त्यांच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी कळविले आहे.
तालुक्यातील खेडगाव येथे महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मीटर तपासणीची मोहीम गुरुवार, २ रोजी राबविण्यात आली. यावेळी गावातील एकूण १८ वीजग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला. त्यावर महावितरण कंपनीकडून त्यांना ५ लाख ५ हजार पाचशे चोपन्न रुपयांचा दंड ठोठवला आला. एकूण ३९०१२ युनिटची चोरी अठरा वीजग्राकांनी केली आहे. यात मनीषा भिकन साळुंखे, भाऊराव लाला साळुंखे, अरुण शंकर साळुंखे, नारायण बळीराम साळुंखे, मनुबाई काशीराम महाजन, लक्ष्मण गोपाळ वाणी, संभाजी परसराम साळुंखे, मेहमूदीबी मणियार, शांताबाई शंकर माली, केशवराम चंदरसिंग, युनूस मुसा खाटीक, अमीर वाझी मणियार, गंभीर अब्दुल पिंजारी, वामन धोंडू पाटील, वसंत कळू पाटील, पुंडलिक झंवर महाजन, नबाबाई काळू चौधरी, राजेंद्र अर्जुन माली आदींचा समावेश आहे. दरम्यान दिलेल्या मुदतीत वरील वीजग्राकांनी दंड भरला नाही. तर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान कोणीही अकोडा टाकून किंवा मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करू नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी केले आहे. सदर कारवाई मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता ब्राह्मणकर (मेहुणबारे उपविभाग) , सहा. अभियंता नागदेव (जामदा कक्ष) , सहा. अभियंता कदम (तरवाडे कक्ष) , सहा. अभियंता खंदारे (खेडेगाव कक्ष ) व लाईन मेन यांच्या पथकाने केली.