यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकत्याच संपलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी पंप विजबिल माफीचा महत्वपुर्ण असा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हिताशी अत्यंत निगडीत या महत्वपुर्ण निर्णयाचा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा हवा आहे तसा फायदा होणार नसुन जळगाव जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेती जमिनीतील खालावलेली भुजल पातळीमुळे दहा व त्या पेक्षा जास्त एचपीची शेती पंप शेतकऱ्यांकडे आहेत.

संपुर्ण जळगाव जिल्ह्लातील शेतकऱ्यांना खालावलेल्या भूजल पातळी ही पाचशे ते सहाशे फुटा पर्यंत खोल गेल्या मुळे शेतकऱ्यांना साडेसातशे पेक्षा जास्त एचपीच्या कृषीपंपाचा वापर करावा लागतो. त्यामुळे शासनाने घेतलेल्या या शेतकरी हिताच्या निर्णयाचा फायदा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही विज बिल माफी मिळणार नसल्याने शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट विज बिल माफी मिळावी अशा मागणीचे निवेदना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, केन्द्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना भाजपा किसान मोर्चाच्या वतीने भाजपाच्या जळगाव पुर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी यांच्या वतीने देण्यात आले आहे.
याप्रसंगी चोपडा आमदार लताताई सोनवणे, भुसावळचे आमदार संजय सावकारे, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील, भाजपा किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्रचे संपर्क प्रमुख सुरेश धनके, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल महाजन, शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस किरण चोपडे आदी पक्षाचे प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या मागणी संदर्भात भाजपाचे पदाधिकाऱ्यांच्या शिष्ठ मंडळाने महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागील दोन तिन वर्षापासुन अववेळी पाऊस नापिकीमुळे झालेले नुकसान व शेतकऱ्यांना शेती विषयक प्रश्नावरून भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी व प्रश्ना बाबत चर्चा करून यासमोर देखील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.