खामगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वीज ग्राहकांकरता दैनंदिन धावपळी रविवारी देखील वीज भरणा सुलभ होण्याकरीत २८ जुलै रोजी रविवार असून देखील अतिरिक्त सेवा घेत खामगाव कार्यकारी अभियंता वीरेंद्र जस्मतिया आणि खामगाव शहर अतिरिक्त कार्यकारी अभियंता गडपाले यांच्या मार्गदर्शनात ग्राहकांकरता आज सकाळपासून वीज भरणा केंद्र सुरू ठेवण्यात आले आहे.
एकीकडे थकीत बिलाची वसुली करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आणि सोबत ग्राहकांना देखील रविवारी सुट्टीच्या दिवशी उपलब्ध करून दिलेलं ही सुविधा ग्राहकांनी या सुविधेचा स्वागत केले आहे. एकंदरीत ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा देण्याकरिता खामगाव वीज वितरण चा उपक्रम स्तुत्य म्हणाला हरकत नाही. अनेक वेळा सरकारी कामकाजाबद्दल लोकांच्या तक्रारी असतात पण अशाच काही लहान छोट्याशा उपक्रमातून एक विश्वास ग्राहकांमध्ये निर्माण होण्यास हातभार लागतो असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.